धरणगाव : प्रतिनिधी
येथील शहराचा पुर्वत्तर भागात तेली तलाव असुन तेथे हजारो लोकांचे श्रद्धास्थान म्हणुन सिध्दी हनुमान मंदीर व ग्रामदैवत म्हणुन मरीआई मंदीर आहे. तेथे दररोज शेकोडो भावीक मोठ्या श्रध्देने व भावनेने दर्शनाला जातात परंतु बाजूस असलेल्ये तेली तलावात घाणीचे मोठे साम्राज्य पसरलेले असुन सर्वत्र दुर्गधीमुळे हवामान दुषित झाले आहे परीणामी परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने पालीका प्रशासना संदर्भात चिड व्यक्त होत आहे.
तरी प्रशासनाने त्वरीत लक्ष घालुन तलावाची साफसफाई करावी अशी मागणी होत आहे. गेल्या दोन दिवसा पुर्वी परिसरातील काही नागरिकांनी पालीका प्रशासनला प्रतक्ष भेट देऊन सफाईची मागणी केली परंतु प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी नी उडवाउडवी चे उत्तरे देऊन दुर्लक्ष केले परंतु हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या ह्या मंदिरातील भाविकांना तलावातील घाणीचा दुर्गंधी मुळे अतोनात त्रास होत असुन शहरातील नागरीक आदोलनाचा तयारीत आहे तरी पालीका प्रशासनाने तलावातील कचरा शेवाये काढुन परिसरातील असंख्य नागरीकाना सहकार्य करावे अशी मागणी होत आहे