मुंबई : वृत्तसंस्था
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे जल जीवन मिशनच्या 40 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन काही दिवसापूर्वी भाजपने केले होते. याच योजनेचे दुसरे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री मुंडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली.
ते म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकार तुम्ही पाडले, पण पाडूनही तुम्हाला मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती आहे. दुसऱ्याची जिरवण्यासाठी स्वतःची जिरली, तरी चालेल असा प्रकार म्हणजे आत्ताचे सरकार असा टोला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाजपला लगावला.
मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पडले पण पाडूनही त्यांना मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती आहे. ज्यांनी माणसं फोडले सुरत होऊन गुवाहाटी, गोवा आणि पुन्हा मुंबईत आणली तरी भाजपला मुख्यमंत्री पदावर बसता आले नाही. दुसऱ्याची तरी जिरवण्यासाठी स्वतःची जिरली तरी चालेल तो प्रकार म्हणजे आत्ताच सरकार आहे.
मुंडे म्हणाले, खासदारांची ऐपत मोठी आहे. आता महसूल मंत्रीपद मिळाले. हे पद चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना मिळाले नाही. एवढे जर तुमचे संबंध आहेत, तर या चाळीस कोटीच्या पाणी योजनेचे श्रेय घेऊ नका एखादा हजार ते दोन हजार कोटींचा प्रकल्प आणून मग श्रेय घ्या, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला.
यापूर्वी वांबोरीत जे चालायचे ते आता चालणार नाही. आता ऐकायला कटू वाटत असले तरी ते ऐकावं लागेल, ज्यांना सहन होत नसेल तर त्यांना कस नीट करायचं ते आम्हाला माहित आहे, असा टोला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक विरोधकांचे नाव न घेता लगावला.