मुंबई : वृत्तसंस्था
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर ने वैज्ञानिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे वैज्ञानिक C, D, E, F च्या एकूण 127 रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार calicut.nielit.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
रिक्त जागांचा तपशील
एकूण पदे – १२७
सायंटिस्ट-सी – ११२ पदे
सायंटिस्ट-डी – १२ पदे
वैज्ञानिक – ई – १ पद
सायंटिस्ट-एफ – २ पदे
वय मर्यादा
वैज्ञानिक पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा स्वतंत्रपणे दिली आहे. सायंटिस्ट-सी साठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे, सायंटिस्ट-डी साठी ४० वर्षे, सायंटिस्ट-ई साठी ४५ वर्षे आणि सायंटिस्ट-एफ साठी ५० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत मिळेल.
शैक्षणिक पात्रता
सर्व पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया भरतीची अधिकृत सूचना वाचा.
अर्ज फी
वैज्ञानिक पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 800 रुपये भरावे लागतील. SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.