मुंबई : वृत्तसंस्था
सोशल मिडीयाच्या माध्यमातून पैसे हि कमवू शकतात. अनेक जण सोशल मीडियाच्या मदतीने लाखोंची कामे करतात हे आपण अनेकदा वाचलं आहे माहिती आहे. पण कधी तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का कि हे पैसे कसे मिळवायचे किंवा कसे मिळतात.
मेटा ने फेसबुक आणि इन्स्टाग्राम क्रियेटर्ससाठी एक नवीन फिचर लॉन्च केलं आहे त्यामुळे युजर्स आता बक्कळ कमाई करू शकतील. कंपनीने डिजिटल कलेक्टिबल टूल जोडण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरुन निर्माते त्यांचे NFT तयार करू शकतील आणि इंस्टाग्रामवर विकून पैसे कमवू शकतील. ही माहिती स्वत: मेटाने शेअर केली आहे,
इंस्टाग्राम आणि फेसबुकवर एक्टिव क्रिएटर्स
तुम्ही तुमची स्वतःची एलएफटी तयार करू शकता म्हणजेच डिजिटल कलेक्शन, सोशल मीडियावर किंवा बाहेर पाठवू शकता. हे करण्यासाठी, निर्मात्यांना कंपनीकडून विशेष साधनं दिली जातील, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होईल. निर्मात्यांना फॉलो करणारे वापरकर्ते WOW NFT खरेदी करून त्यांच्या आवडत्या निर्मात्यांना समर्थन देऊ शकतात.
ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही साधने आणण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डिजिटल कलेक्टिबल्समध्ये व्हिडिओही असू शकतात. तर मग आता वाट कसली पाहायची. आपल्या सोशल मीडिया अकॉउंटचा वापर करा आणि लाखो कमवा..