परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील रखडलेली पोलीस दलातील शिपाई भरती आता मार्गी लागली आहे. परभणी जिल्ह्यातील 75 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरती प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवारांना 9 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पोलीस दलाच्या Policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेत पहिल्यांदा शारीरिक क्षमता चाचणी आणि नंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये याबाबत सर्व नियम अटी देण्यात आले आहेत. त्यामुळे एकदाची भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे.
परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रियाबाबत
परभणी पोलीस विभाग अंतर्गत, पोलीस शिपाई पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल. तसेच पोलीस भरती 2022 साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे (डॉक्युमेंट्स) Policerecruitment2022.mahait.org लिंक वर दिलेली आहेत. तसेच परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया याबद्दल माहितीही या लिंकवर उपलब्ध आहे.