Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ रोख एटीएम फोडणाऱ्या संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात
    क्राईम

    ‘त्या’ रोख एटीएम फोडणाऱ्या संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात

    editor deskBy editor deskNovember 5, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील विसनजी नगरातील कॅनरा बँकेचे एटीएम फोडून त्यामधील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला असल्याने बँकेच्या प्रशासनातर्फे दि.३ रोजी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एक संशयितास जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, दि ३ रोजी शहरातील विसनजी नगरातील कॅनरा बँकेचे एटीएम फोडून त्यामधील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला असल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हाचा तपास हे.कॉ.फिरोज तडवी यांच्याकडे देण्यात येवून त्यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीनुसार अयोध्या नगरातील संशयित आरोपी विशाल गोकुळ राजपूत याला ताब्यात घेतले आहे.
    यावेळी हे.कॉ.फिरोज तडवी यांच्यासोबत जिल्हा पेठच्या डीबी पथकातील अंमलदार पोलीस नाईक जुबेर तडवी व पोलीस शिपाई अमित मराठे यांच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले असता त्याने त्याच्या साथीदारासह नमूद चा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि ५ रोजी त्याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केले असता. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याच्या सोबत असलेल्या एका संशयित आरोपीचा शोध पोलीस करीत आहे. पुढील तपास पोलीस हवालदार फिरोज तडवी हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.