लाईव्ह महाराष्ट्र :भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तितूर नदीच्या उगमस्थानावर जोरदार पाऊस झाल्याने आठ दिवसांत दुसऱ्यांदा महापूर आला असून नदीकाठावरील जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. यामुळे कोणतेही हानी झालेली नाही.
चाळीसगांव तालुका परिसरात आठ दिवसांनंतर दुसऱ्यांदा जोरदार पावसाने झोड़पल्याने महापुराचा सामना करावा लागत आहे. सकाळी चार वाजेच्या सुमारास तितुर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. यावेळी देखील नदीपात्रातील पाणी गावात शिरल्याने जूनेगाव ते नवेगावातील मुख्य रस्ता बंद होऊन नागरीकांचा संपर्क तुटला होता. जवळपास पाच ते सात तास वाहतूक ठप्प झाली होती.भोरटेक, खाजोळा, पिप्री, वडगाव या गावांचा पुन्हा संपर्क तुटला आहे. या भागातील शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मार्ग देखील बंद झाला आहे. दरम्यान ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली आल्यामुळे सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.