Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बापरे ! : गांजाच्या शेतात पोलीसांचा छापा; ६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
    एरंडोल

    बापरे ! : गांजाच्या शेतात पोलीसांचा छापा; ६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोन जणांवर गुन्हा दाखल; एरंडोल पोलीसांची कारवाई

    एरंडोल- प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारामध्ये अवैधरित्या गांजाची शेती केल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ६१ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तुर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड करून संगोपन होत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी छापा टाकून दोन्ही शेतातून ६१ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ८७५ किलो गांजा ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता हा गांजा दरम्यान पोलिसांची कुणकुण लागताच दोन्ही संशयित आरोपी हे शेतातून पसार झाले आहे. याबाबत पोलीस हवालदार विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.