लाईव्ह महाराष्ट्र : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा यासाठी भुसावळ शहरांमध्ये पोलीस विभागाकडून ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात एक तडीपार आरोपी त्याच्या कडील तलवार जप्त ,गुन्ह्यातील एक आरोपी तर एकाच्या घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.भुसावळ उपविभागात ऑल आऊट ऑपरेशन मोहीम बाजारपेठ व भुसावळ शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली.
आगामी सार्वजनिक गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा व या काळामध्ये समाजकंटकांवर वचक राहावा या दृष्टीने 7 च्या रात्री 10.00 ते 8 च्या पहाटे 3.00 पर्यंत भुसावळ शहरांमध्ये पोलीस विभागाकडून ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले.
या ऑपरेशन मध्ये 18 तडीपार आरोपी चेक करण्यात आले होते त्या पैकी हेमंत पैठणकर हा तडीपार आरोपी मिळून आला त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्या विरोधात कलम 142,122 म पो अधिनियम, 4/25 आर्म ऍक्ट प्रमाणे कारवाई गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर आरोपी शाहिद शे पिंजारी रा गरीब नवाज याचे घरझडती घेतली असता 2 तलवारी मिळून आल्या त्या बाबत 4/25 आर्म ऍक्ट कारवाई करण्यात आली
गुन्ह्यात पाहिजे असलेले 21
आरोपी चेक केले असता ,त्यापैकी आरोपी राहुल नेहते रा पाटील मळा मिळून आला असून त्यास अप न 78/20 भा द वि कलम 376 ,363 सह पोस्को मध्ये अटक करण्यात आली.
तर भुसावळ शहर पोलिस स्टेशनला पाहिजे असलेला आरोपी मनोज अशोक साळुंके यास गुन्हा रजिस्टर क्रमांक 70 /20 कलम 307 मध्ये अटक केली.दारूबंदी कायद्याप्रमाणे 4 केसेस. 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गणपती उत्सव निमित्ताने कलम सीआरपीसी 144(3) प्रमाणे प्रातधिकार यांनी काढलेले तालुका बंदी चे 20 आदेश बजावणी केली. त्यानुसार आदेशात नमूद केलेल्या व्यक्तींना भुसावळ शहर व भुसावळ तालुका महसूल सीमेच्या हद्दीमध्ये 9 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. 23 समन्स बजावणी ,6 बेलेबल वारंट बजावणी ,3 नॉन बेलेबल वॉरंट बजावणी करण्यात आली आहे
तर शहरात रात्री नाकाबंदी लावून उशिरा फिरणारी 61 वाहने चेक केली.एक संशयित वाहन मिलून आले.त्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 प्रमाणे कारवाई करून गुन्हा नोंद केला. पुढील तपास करत आहोत.
उपविभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंगळे,भुसावळ शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक शेंडे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक दूनगहू, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंटला,सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी,त्याचप्रमाणे भुसावळ शहर व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या गुन्हे शोध पथकाने केली .