धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली.
जळगांव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातगंगापुरी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच यानंतर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली यात अंबादास दानवे म्हणाले की, “संकट कितीही मोठं असलं तरीही शिवसेना तुमच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून उभी आहे. सरकारमध्ये नसल्याने तुम्हाला देण्यासाठी आमच्या हाती काही नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी कर्जमुक्ती केली होती. अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचली होती. मात्र आताही तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तातडीची नुकसान भरपाई दिली पाहिजे, शेतीचे पंचनामे लगेच झाले पाहिजेत. नेते आणि मंत्र्यांनी नुकसानग्रस्त परिसरात दौरे करायला हवेत आणि शेतकऱ्यांना आपल्यासाठी राबणाऱ्या बळीराज्याला आपलं सरकार आहे, असं वाटलं पाहिजे.”
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज धरणगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नुकसानीची माहीती घेतली. तसेच सरसगट पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. दिवाळी आनंदी शिधा ही योजना नियोजनअभावी फसली असून अनेकांना आजही शिधा मिळाली नसल्याची तक्रार सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली. तसेच संजय गांधी निराधार योजनेची मागील काही महिन्यांपासून बैठक घेतली नसल्याची बाब देखील श्री. दानवे यांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, धरणगावचा पाणी पुरवठा विषयी तर गुलाबराव वाघ आणि माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बैठकीत चांगलेच वाभाडे काढले. यावेळी विष्णू भंगाळे, अॅड.शरद माळी, धीरेंद्र पुरभे, भागवत चौधरी बापू महाजन चेतन जाधव राहुल रोकडे योगेश वाघ, जानकीराम पाटील,विनोद रोकडे जयेश माळी सह शेतकरी उपस्थित उपस्थित होते.