जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अंजाळा ता. यावल येथील एका अल्पवयीन मुलाकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.
सविस्अतर वृत्त असे की, जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व अपर पोलीस अधीक्षकचंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किसन नजनपाटील दि.३ नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, अंजाळा ता. यावल येथे विधी संघर्षीत बालक याच्याकडे चोरीच्या मोटार सायकली असून त्यांची तो कमी किमतीत विक्री करीत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ/महेश आत्माराम महाजन, पोना/ नंदलाल दशरथ पाटील, किरण मोहन धनगर, भगवान तुकाराम पाटील, राहुल बैसाणे, चापोहेका/भारत पाटील यांचे पथक तयार करून त्यांना अंजाळा ता. यावल येथे रवाना केले. याठिकाणी पथकाने विधी संघर्षीत बालकाकडून सावदा पोलीस स्टेशन गुरनं.१४०/२०२२ भादंवि क.३७९ व गु.र.नं.८/२०२१ भादंवि क.३७९ या गुन्हयांतील चोरीच्या २ मोटार सायकली जप्त केल्या. सदर मोटार सायकली बाबत विधी संघर्षीत बालक अधिक विचारपुस करता त्याने सावदा गावातील बाजारपट्ट्यातुन चोरी केल्याचे सांगत असून त्याचा साथीदार तेजस सपकाळे (रा. अंगाळा ता. यावल) हा असल्याचे सांगितले आहे. एलसीबीच्या पथकाने तेजस सपकाळे याचा शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही. वरील गुन्हयांतील दोन्ही मोटार सायकली पुढील तपास कामी सावदा पो.स्टे. च्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. विधी संघर्षात बालक यास त्यांचे वडिलांनी सावदा पोलीस स्टेशनला हजर केले आहे.