जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी लांबविल्याची घटना घडल्याने जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पारोळा येथील रहिवासी किशोर रामदास ठाकरे(३६) हे जिल्हा सामान्य रुग्णालयात दि२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास काही कामानिमित आले असता. त्यांनी दुचाकी क्र.एम.एच.१९.डीएल.०८९१ हि त्यांनी न.१ च्या गेटजवळ पार्क करून गेले असता पुन्हा दुपारी येवून दुचाकी पाहिली असता घटनास्थळाहून दुचाकी न दिसल्याने त्यांनी जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.भारती देशमुख हे करीत आहेत.