अमळनेर प्रतिनिधी : जानवे या गावात ग्रामपंचायत हे भ्रष्टाचाराचे कुरण ठरली आहे ज्या रस्त्याची पूर्णतः किंवा पूर्ण झाला नाही त्या रस्त्याची एम बी लिहण्यात येऊन बिल काढण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.यावरून ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू असल्याचे उघड होत आहे .
जानवे गावात सद्यःस्थितीला खूप अनागोंदी कारभार सुरू असून
भ्रष्टाचाराचे कुरण झालेली आहे जानवे गावातील वार्ड क्र. २ मधील प्रकाश धुडकू पाटील ते विलास धोंडू पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कामाची एम बी लिहण्यात आली आहे जेव्हा की प्रत्यक्षात हा रस्ता झालेला नाही तरी त्या रस्त्याची बिल (MB) लिहिले गेले आहे. कदाचित ठेकेदाराला पैसे मिळाले असतील ? वेळोवेळी लेखी तक्रार करुनही (इंजिनिअर गवळी, ग्रामसेवक के. आर. देसले, ठेकेदार यांची पार्टनरशिप असल्याची गावात चर्चा आहे.) लक्ष न देता ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. यामुळे जानवे ग्रामपंचायत ही भ्रष्टाचाराचे कुरण भ्रष्टाचाराचे कुरण आहे का ? अशी शंका जानवे ग्रामस्थांना उपस्थित होत आहे.याकडे कोणी लक्ष देणार की बिना रस्ता बिल काढण्यात येणार असं प्रश्न ग्रामस्थानांना पडले आहे