आम्ही पण वक्ते, भाषणं आम्हीही करतो, पण असे कधी बोलत नाही- पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव प्रतिनिधी । सभेचे आम्ही पण वक्ते आहोत, भाषणं आम्हीही करतो पण असे खालच्या पातळीवर आम्ही कधीच बोलत नाही. दबावाचं राजकारण आम्ही कधीच केलं नाही अशी प्रतिक्रिया ‘लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी’ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
धरणगाव सभेत युवासेने राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांबद्दल पातळी सोडून खालच्या शब्दात टिका केली. त्याबद्दल धरणगाव पोलीस ठाण्यात शरद काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
गुन्हा दाखल होत असल्याचे लक्षात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री यांच्यावर टिका केली होती. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रीया दिली.
पुढे बोलतांना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ॲडमीट आहे. धरणगावला सभा माझ्या पश्चात झाली. सभा आम्हीपण करतो सभेचे वक्ते आम्ही पण आहे. भाषणे कशी करायची याचं डोकं आम्हाला पण आहे, त्यांना पण आहे. पण कोणताच समाजाचा माणूस भाषण करतांना एखादा गुलाबराव पाटलावर बोलू शकतात.
पण येड्या समाजाचा, बेवड्या बापाचा, हारामखोर जातीचा असा कोणताच समाजाचा माणूस कोणत्याही माणसावर टिका करू शकत नाही. त्यांनी माझ्यावर टिका केली त्यामुळे नागरीकांनी शरद कोळी यांच्याविरोधात तक्रारी दिल्या. यात कलम १५३ अ मध्ये दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला आहे. ते जर दलीत समाजाचे म्हणत असतील तर आम्हीपण कोळी समाजात लहानपणापासून मोठे झालो आहोत.
कोळी समाजात प्रत्येक जण एकमेकांविरोधात असं आमच्याकडे कधी झालं नाही. अश्या पध्दतीने समाजात तेढ निर्माण करत असेल तर ही बाब चुकीची आहे.
गुलाबराव पाटील दबाव टाकतो आहे. दबाव टाकला असता तर धरणगावलाच सभा होऊ दिली नसती. तो माझा धंदा नाही. आजपर्यंत मी असे दबावाचं राजकारण कधीच केलं नाही.
त्यामुळे आता दबावाचे राजकरण करत असल्याचं सांगून मला दबावाच राजकारण शिकवताय असं मला वाटतं, अशी प्रतिक्रीया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
एखाद्या राज्याचा राज्यमंत्री राहिलेला आणि मंत्रीमंडळात मंत्री
म्हणून आज समाजात वावरत असतांना अशी टिका करणे चुकीचे आहे. कोण आहे सुषमा अंधारे !, परळी वैजनाथ मतदार संघात आमदाराच्या निवडणूकी अंधारे यांना ४३० मते मिळाली.
त्यावेळी हिंदू धर्माविषयी टिका केल्या, रामाची शबरी काढली, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेलवर टिका करते, त्याची गरज उध्दवसाहेबांना पडते. बाळासाहेबांची तलवार हातात धरली तर अंधारे थरथर कापते. अशी जोरदार टिका त्यांनी केली.