धरणगाव प्रतिनिधी : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले . शाळेतील शिक्षकाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित व माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नाजूका भदाणे यांनी शिक्षक दिनाचे महत्व व समाजाच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका याचे महत्व सांगण्यात आले. शाळेच्या प्राचार्या, शाखा व्यवस्थापक यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी स्वतः लिहिलेल्या कवितेतून शिक्षकांची भूमिका किती महत्वाची आहे याचे सुंदर वर्णन केले.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, पुष्पलता भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, नाजनिन शेख, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड, अमोल सोनार हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे व इंद्रसिंग पावरा हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाजुका भदाणे यांनी केले.