रक्तदान केल्याने दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो हे तर आहेच पण जो रक्तदान करतोय त्याचे आरोग्यही उत्तम असते. ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ असं म्हटलं जातं. कारण रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळेच रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे वागवे ठरणार नाही. जेव्हा एखाद्याला व्यक्तीला रक्त दिलं जातं, तेव्हा त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासारखं आहे. जर तुम्ही नियमीत रक्तदाते असाल तर रक्ताशिवाय त्यामधून आरबीसी आणि प्लाज्मा वेगळं करुन लोकांना दिला जातो. म्हणजे, ज्या पद्धतीचा रुग्ण असेल त्याला ते दिलं जातं. रक्तदानासाठी आपल्या देशात अनेक प्रकाराची जागरुकता अभियान आणि कॅम्पियन राबवली जातात. पण अनेकदा जेव्हा रुग्णाला रक्ताची गरज असते तेव्हा रक्त मिळत नाही. त्याची अनेक कारण आहेत, त्यापैकीच एक लोकांच्या मनात रक्तदानाबद्दल असलेली चुकीची माहिती. लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला होणारे फायदे अनेकांना माहित नाहीत.
रक्तदान केल्यानंतर काय फायदा होतो?
जेव्हा कुणी रक्तदान करते तेव्हा त्याच्या शरिरातील रक्ताची पातळी कमी होत नाही. कारण, रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टर रक्तदात्याचं हीमोग्लोबिन, ब्लड यूनिट आणि ब्लड प्रेशर यासारख्या सर्व गोष्टींची माहिती घेत असतात. जेव्हा रक्तदान केलं जातं, तेव्हा शरिराला अनेक फायदे होतात. आरोग्य सदृढ होण्यास फायदा होतो.
आयर्नचा समतोल – रक्तामध्ये आयर्नची (लोह ) कमतरता असेल तर अचणींचा सामना करावा लागू शकतोच. त्याशिवाय आर्यनचं प्रमाण वाढल्यावर अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे, लिव्हर खराब होणंस पेशींचं नुकसान आणि शरिराच्या ऑक्सिडेटिव्ह लाइफमध्ये वाढ होते. म्हणजेच, आपल्याला या आजारांमध्ये खूप उशीराने माहिती मिळते. पण जे नियमीत रक्तदान करतात, त्यांच्या शरिरातील आर्यनची मात्र समतोल असते. त्यामध्ये चढ अथवा उतार पाहायला मिळत नाही.
हृदयरोगाचा धोका कमी होतो – शरीरात मोठ्या प्रमाणात लोह (आर्यन) तयार होण्यामुळे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होऊ शकते. अॅक्सिडेटिव्ह रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नियमित रक्तदान केल्याने लोहाची पातळी समतोल राहते आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
कर्करोगाचा धोका कमी – नियमितपणे रक्तदान केल्यामुळे कर्करोगाचा धोका टळू शकतो. रक्तदान केल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगापासून दूर राहू शकतात. रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही रक्तदानामुळे मदत होते.
रक्तदान करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी –
रक्तदान करणाऱ्याचं वय 18 ते 65 यादरम्यान असायला हवं.
रक्तदान करणाऱ्याचं वय 45 किलोपेक्षा जास्त असावं.
प्रत्येकवेळी रक्तदान करताना तीन महिन्यांचं अंतर असावे.