जळगाव : प्रतिनिधी
राज्यात शिंदे सरकार व काही मंत्र्यांमध्ये सुरु असलेले राजकीय धुमाकूळ पाहता राज्यातील काही मंत्र्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हि एका कार्यक्रमात शेरोशायरी करीत हास्यकल्लोळ निर्माण केला आहे. खोके अर्थात पैसे घेतल्याचे आरोप करण्यासाठी, आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक आमच्यावर सोडण्यात आले आहेत, असा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगावात एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी यावर तुफान शेरेबाजी केली. ते म्हणाले, “बदनाम जो होते है जो बदनामी से डरते है हम तो व बदनाम है बदनामी हमसे डरती है.” मात्र तीन-चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून इकडे आलेले लोक आमच्यावर टीका करत आहेत. तू सिद्ध करून दाखव कुठे झालंय, अशी टीकाही गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांच्यावर केली.
सर्वांनी पाणी प्या आणि मैदानात या…
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाण्यावरूनही महाविकास आघाडीला टोमणे मारले. ते म्हणाले, ‘ पाण्यामध्ये राजकारण न करता काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना व उद्धव ठाकरेवाले सर्वांनी पाणी प्या आणि मैदानात या…. पाण्यात जात धर्म पंथ पाहायचा नसतो हे कोरोना काळात सर्वांनी अनुभवले असून मात्र कोरोना काळात माणसांची एकजूट पाहायला मिळाली…
शिट्टी मारली की आजा मेरी गाडी में…
पाण्याच्या कामात इमानदारी पाहिजे मात्र आजच्या काळात प्राथमिक शिक्षक व मिल्ट्री मधला माणूस हेच इमानदार आहेत बाकी माझ्यासह कुणीही इमानदार नसून सद्यस्थितीत शिट्टी मारली की पैसे, आजा मेरी गाडी मे बैठ जा… अशी परिस्थिती असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. अप्रत्यक्षपणे राजकीय परिस्थितीवर गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधले.
बाळासाहेबांच्या कृपेने आपलं दुकान बरं…
मी गावरान माणूस असून दादा कोंडके चा पिक्चर पाहणारा माणूस आहे. त्यामुळे डबल अर्थी बोलणारच तसं नाही बोललो तर मंत्र म्हणण्यासारखं होईल, असेही गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले. दरम्यान योगायोगाने चुकून या धंद्यात आलो मी कीर्तनकार असतो तर यापेक्षाही मोठी गर्दी झाली असती… पण बाळासाहेबांच्या कृपेने आपलं दुकान बरं चाललं आहे, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी भन्नाट भाषण केले आहे.
अपमान करणाऱ्यांना इशारा-
पूर्वी राजाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा राजा व्हायचा. मात्र आता राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही, तर राजा हा जनतेच्या मतदानातून जन्माला येतो, त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहो. पन्नास हजार मतांनी आम्ही निवडून आलेलो आहोत. म्हणून तर कोणी ऐरे गैरे नथ्थू खैरे आम्हाला पाडून टाकू असे बोलतायेत… मात्र शंभर दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखा जगा हेच शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.