जळगाव : प्रतिनिधी
पोलीस स्थानकामध्ये नेहमी कोणते ना कोणते गुन्हे दाखल होत असतात पण प्रत्येक गुन्हे दाखल झाल्यावर संशयित आरोपीला अटक करणे म्हत्वाचे असते, पण जिल्हातील एका पोलीस स्थानकात अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सपोनि तसेच उपनिरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोतर्फे एका पथकाची निर्मिती करून सापळा रचण्यात आला. या पथकाने सापळा रचल्यानंतर सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांना अटक केली.