जळगाव : प्रतिनिधी
शहरातील दूध फेडरेशन परिसरातील रहिवासी लखन अशोक खुळे (वय ३२) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लखन याने गळफास घेतल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यावर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. प्राथमिक तपास सहायक फौजदार उल्हास चहाटे व विलास पवार करीत आहेत.