जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यापासून नेहमी चर्चेत राहणारी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. ३ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. दूध संघासाठी दि. १० डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली आहे.
राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाच्या मंजुरीने दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.
या पद्धतीने असेल निवडणुकीचा कार्यक्रम – नामनिर्देशन पत्र दाखल करणे दि. ३ ते १० नोव्हेंबर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणुक कार्यालय दूध संघ, नामनिर्देशन पत्रांची छाननी- दि. ११ नोव्हेंबर, वैध नामनिर्देशन पत्र जाहीर करणे- दि. १४ नोव्हेंबर, नामनिर्देशन पत्र माघार- दि. १४ ते २८ नोव्हेंबर, अंतीम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप- दि. २९ नोव्हेंबर, मतदान- दि. १० डिसेंबर सकाळी ८ ते ४ या वेळेत, मतमोजणी- दि. ११ डिसेंबर सकाळी ८ वाजेपासून
खुला प्रवर्ग (तालुका निहाय) १५ महिला राखीव-२, इमाव-१, अ.जाती-जमाती १, विजाभज व विमाप्र-१ एकूण २०, असे मतदार संघनिहाय उमेदवार निवडुन द्यावयाचे आहे.