जळगाव प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील अनेक गावांना रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपले असून यामुळे मोठी हानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला होता. याच्या पाठोपाठ आता काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा तोंडापूर ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शासन स्तरावर तात्काळ पाहणी करावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील ओझर गावांमध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली यामध्ये सुमारे ९० टक्के गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला आहे. भागदरा या गावाजवळील गाव तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले. तर अनेक शेतातील कपाशी वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघ गावाचा संपर्क तुटला असून यावेळी गावातील दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करीत आहे
जामनेर तालुक्यातील ओझर येथे पाऊस व चक्रीवादळामुळे संपूर्ण गावाचे मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणी तहसीलदार अरुण शेवाळे नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली तर मदत कार्यासाठी जामनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधना महाजन भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर गटनेते डॉक्टर प्रशांत भोडे महेंद्रकर बाविस्कर यांच्यासह भाजप कार्यकर्ते करीत आहे