जळगाव : प्रतिनिधी
हेमंत क्लासेसमध्ये सुरु असलेला दिवाळीचा ज्ञानोत्सव म्हणजे दिवाळीत प्रत्येकाच्या घरात फराळ बनतो म्हणजेच दरवर्षी प्रत्येक घरात नवनवीन काही तरी तिखट गोड खावून दिवाळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे शिक्षणाचेही तसेच आहे. नेहमी अभ्यास तर असतोच पण व्यक्तिमत्व विकासासह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान हे मुलांना विकसित होण्यासाठी हेमंत क्लासेसचा ज्ञानोत्सव म्हणावा लागेल.
गेल्या पाच दिवसापासून जळगाव शहरातील महाबळ परिसरातील हेमंत क्लासेस 10 वीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी दरवर्षाप्रमाणे यंदाही ज्ञानोत्सव घेण्यात आला यामध्ये पाच दिवस विद्यार्थ्यांना विविध प्राध्यापक, डॉक्टर अशा व्यक्तीमत्वाचे मार्गदर्शनाची मेजवाणी विद्यार्थ्यांसाठी दिली होती जेणेकरून दहावी हा शिक्षणाचा टर्नीग पॉईट असून दहावीत परिक्षा अभ्यासाचा सराव कसा केला जाईल, यावर मार्गदर्शन असेल किंवा व्यक्तीमत्वाचा विकास कसा होईल. यावर असेल तर दि. 30 रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला डॉ.अकोले यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्याबाबत त्यांच्या समस्येचे निराकरण करून पालकांसोबतही संवाद साधला. या चर्चासत्रात पालकांनीही प्रश्न विचारून समस्या सोडवून घेतल्या.