जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. तिला दि २८ रोजी तिच्या घरातून अनोळखीने पळवून नेल्या प्रकरणी दि ३० रोजी शनिपेठ पोलिसात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि.प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.