Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुजरातमध्ये केबल पूल कोसळला ; ४०० जण नदीत पडल्याचा अंदाज !
    क्राईम

    गुजरातमध्ये केबल पूल कोसळला ; ४०० जण नदीत पडल्याचा अंदाज !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 30, 2022Updated:October 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत व्यक्त केले दु:ख

    गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे चारशे लोक नदीत बुडाले आहेत.

    मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते. यावेळी पूलावर असणारे चारशे पेक्षा जास्त लोक नदीत बुड्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती केली होती. या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.