भडगाव पोलिसात तरुणीविरोधात गुन्हा दाखल
जळगावातील एका परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने भडगाव येथील एका प्रियकरासोबत लग्न करून द्यावे, असे म्हणत एका तरुणीने सिनेस्टाइल पद्धतीने प्रियकराच्या घरी जात धिंगाणा घातल्याची घटना भडगावात घडली. तरुणाशी माझे लग्न करून द्या, असे सांगून तरुणाची आई आणि वहिनीलाही तरुणीने चापटाबुक्क्यांनी मारहाण करत घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
जळगावातील एका तरुणीचे संबंधित तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. आपले लग्न तरुणाशी लावून द्या, अशी मागणी करत तरुणाच्या घरात घसून तरुणाच्या आईला आणि त्याच्या वहिनीला शिवीगाळ करत माहराणही केली. एवढेच नाही तर जोपर्यंत तुमचा मुलगा घरी परत येणार नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. नाहीतर मी तुमच्या घरासमोर आत्महत्या करून घेईन, अशी धणकीही तरुणीने मुलाच्या नातेवाईकांना दिली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस कर्मचारी करीत आहे.