जळगाव : प्रतिनिधी
शिंदे गटाचा एक मंत्री आणि एक आमदार यांच्यात दोन दिवसापासून चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मानापमान नाट्यावरून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला असल्या तरीही हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. एकाच जिल्ह्यातील या नेत्यांमधील वादामुळे मुख्यमंत्र्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. वाद सुरू असलेल्या एक मंत्री म्हणजे गुलाबराव पाटील आणि आमदार म्हणजे चिमणराव पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे.
तर दुसरीकडे नेते शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतेच आ.चिमणराव पाटील यांच्यावर टीका केली आहे, ते म्हणाले कि, चिमणआबांना शिवसेनेत १९९७ साली मी आणले आहे, ते जरी माझ्यानंतर शिवसेनेत आले असल्याने ते माझ्या जुन्या मतदार संघात आमदार झालेले आहे. ज्यावेळेस तिकीट मंजूर झाले तेव्हा मीच त्यांना मतदार संघात घेवून फिरलो त्यामुळे त्यांच्या बाबतीत व माझ्या बाबतीत कधी कटुता नव्हती. आता जर एखादी नारळ फोडल्यावर राष्ट्रवादीला बळ मिळत असेल तर मी रोज नारळ फोडेल. अश्याने होत नाही जनतेची कामे करावी लागतात, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आ.चिमणराव पाटील यांना जनतेची कामे करण्याचा सल्ला दिला आहे.