धुळे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील धरणगाव येथील दाम्पत धुळे येथे भाऊबीजेसाठी गेले होते, भाऊबीज झाल्यानंतर माघारी येत असतांना अचानक रस्त्यावर गर्दी दिसते आणि ते थांबून विचारपूस करीत तेथे एका गरोदर माता आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी पोटात कळ काढत असतांना दिसताच क्षणी विसावे दाम्पत्यांनी ‘त्या’ महिलेला आधार देत आपली सामजिक भान जोपासून महिलेसह नवजात शिशुचे प्राण वाचविल्याने आज धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात त्या दाम्प्ताचे कौतुक होत आहे.
काय आहे नेमकी घटना ?
औरंगाबाद येथील वैजापूरहून दुचाकीवर मुकेश पवार हे आपल्या गरोदर पत्नी व दोन मुलासोबत सेंधवा येथे निघाले होते. ते धुळे एमआयडीसी ते अवधान गावाच्यामधील मुख्य रस्त्यावर असतांना त्यांच्या गरोदर पत्नीला पोटात कळा निघू लागल्या यावेळेस या रस्त्यावरील काही लोक गर्दी करून बघ्याची भूमिका घेत होते, परतू महिलेला कुणीही मदत करीत नसल्याची घटना दिसत होती, यावेळी तुकाराम विसावे हे आपल्या परिवारासह अवधान येथून धुळे येथे जात असतांना त्यांना रस्त्यात गर्दी दिसल्याने त्यांनी तत्काळ गाडी थांबवून त्यांच्या पत्नी नीता तुकाराम विसावे यांनी त्या महिलेची विचारपूस करून तिच्या पोटात कळा निघत असल्याने ती महिला भर दुपारी १ वाजेच्या सुमारास रस्त्यावरच प्रसूती झाली. यावेळी नीता विसावे यांनी या महिलेची प्रसूती पूर्ण केल्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक व धुळे जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका येवून त्या महिलेसह नीता वसावे यांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल करून त्या महिलेला एक गोंडस मुलगी जन्माला आली आहे, यामध्ये मुलगी व तिची आई आता सुखरूप असल्याचीही माहिती नीता विसावे यांनी दिली आहे.
नीता विसावे यांनी एक सामाजिक भान जोपासत रस्त्यावर या परिवाराला जी मदत करून त्या मुलीचे व आईचे प्राण वाचविल्यामुळे येथील रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमाण्यांनी विसावे परिवाराचे कौतुक केले आहे. तर या महिलेचा पती मुकेश पवार यानेही वसावे दाम्पत्याचे आभार मानून रस्त्यावर मिळालेले ‘देवमाणूस’ तर आज तुम्ही मला केलेली मदत म्हणून माझी पत्नी वाचली अशा शब्दात कौतुक केले आहे.