जळगाव : प्रतिनिधी
राज्यात शिंदे सरकार व महाविकास आघाडी सरकारमधील नेत्याची आता रोज टीका टिपणी होत आहे, यावर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांनी आज जळगावात विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे.
राज्यातील सर्व विरोधक म्हणतात म्हणे कुछ तो होणेवाला है,कुछ तो होणेवाला है असे काही होणार नाही मात्र मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ. मला कितीही त्रास दिला तरी मी तुमच्या उरावर बसणार आहे असा इशारा जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात दिला आहे.
नेमके काय म्हणाले खडसे? माझ्या पाठिशी कामाच्या आणि संपर्काच्या बळावर जनता उभी राहिली. एकनाथ खडसेंला काही तरी करून जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुलभ करायच्या हा विरोधकांचा प्रयत्न आहे. विरोधकांकडून सातत्याने माझा छळ सुरू आहे, मला अडकविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनता गेली 40 वर्षे मा्झ्या सोबत आहेत, आणि यापुढेही माझ्यासोबत राहिल, यामुळेच मी सर्वांचे हे प्रयत्न हाणून पाडतो आहे. सर्व विरोधक म्हणतात म्हणे कुछ तो होणेवाला है,कुछ तो होणेवाला है असे काही होणार नाही मात्र मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या ऊरावर बसेन, असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला.
आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांवर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला 7 ते 8 आमदारांचे फोन आले तेही यामुळे नाराज आहेत, 1 तारखेपर्यंत पुरावे दिले नाही तर 7 ते 8 आमदारांना घेऊन निर्णय घेणार असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा खडसे यांनी केला.