• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मयत तरून तिरडीवर उठून बसला…पोलिसांनी केला पर्दाफाश

editor desk by editor desk
October 27, 2022
in क्राईम, राज्य
0
मयत तरून तिरडीवर उठून बसला…पोलिसांनी केला पर्दाफाश

अकोला : वृत्तसंस्था 

जिल्ह्यातील एक मृत युवकाला जिवंत करुन गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून माडला आहे. बुधवारी सायंकाळी एका युवकाचा अंत्यसंस्कार होत असतानाच तो तिरडीवर उठून बसला होता. मात्र, हा केवळ भोंदूगिरीचा प्रकार असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
पातूर तालुक्यातील विवरा गावात ही घटना घडली. मृत झाल्याचा बनाव करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस स्टेशनमध्येच त्याची आरोग्य तपासणी केली असता युवक निरोगी आढळून आला आहे. आता हा प्रकार युवकाच्या कुटुंबीयांनी का केला? याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी एका वृत्संस्थेला दिली आहे.
विवरा येथील होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत मेसरे याला दातखिळी येण्याचा आजार आहे. उपचारासाठी त्याला कुटुंबीयांनी खामगाव येथील डॉक्टरांकडे नेले होते. प्राथमिक तपासणी व उपचारानंतर डॉक्टरांनी काही चाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर युवकाला अकोला येथे उपचारासाठी नेत असल्याचे सोबतींनी सांगितले. मात्र, त्याला अकोला येथे उपचारासाठी न नेता गावात आणण्यात आले.
बुधवारी सायंकाळी गावामध्ये प्रशांत मृत झाल्याची माहिती पसरली. गावातील सर्व नागरिकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. तेथे नातेवाईक अंतिम संस्काराची तयारी करत होते. प्रशांतला तिरडीवर ठेवण्यात आले. अंत्ययात्रा पाचशे मीटर अंतरावर गेली असता प्रशांतच्या आईने मुलाला गावातील मांत्रिक दीपक गणेश बोरले यांच्याकडे घेऊन नेण्याचे सांगितले. तेव्हा अंत्ययात्रा अंतिम संस्कारासाठी न नेता महाराजांकडे वळवली. महाराजांच्या मंत्र उपचारानंतर काही कालावधीतच तिरडीवरील मयत प्रशांत मेसरे उठून बसला. यावेळी अंतिम संस्काराला आलेले नातेवाईक आणि गावकरी चकीत झाले.
पोलिसांनी सर्व घटनाक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, युवकाला त्याच्या आई-वडिलांनी दवाखान्यात न नेता सैलानीकडे नेले. त्यापूर्वी त्याच्या दवाखान्यात रक्तदाब व इतर वैद्यकीय चाचण्या केल्या. त्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या. त्यानंतर बुधवारी सांयकाळी युवकाला घरी आणले. त्यानंतर त्याच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली. तातडीने त्याला घरुन हलवले आणि लगेच तिरडी पाचशे मीटर जात नाही तोच त्याच्या आईने महाराजांकडे घेऊन चला, असा आग्रह धरला. हा सगळाच प्रकार बनावट असल्याचे प्रथम दर्शनी आढळून येते, असे पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी एका वृत्संस्थेला सांगितले. त्याबरोबरच गावचे माजी उपसरपंच अमर पजई, सरपंच माणिक देठे, हरीभाऊ इंगोले यांनाही प्रकाराबाबत संशय व्यक्त केला आहे.
चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, पीएसआय गणेश महाजन, पोलीस पाटील भुजंगराव देशमुख आदींनी पीडित मुलगा प्रशांत याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची आरोग्य तपासणी केली. तपासणीमध्ये तो निरोगी असल्याचे आढळले. मात्र, त्याला मानसिक उपचाराची आवश्यकता आहे काय? याची चौकशी पोलिस करीत आहे. यासर्व प्रकारामुळे विवरा गाव राज्याच्या पटलावर चर्चेत आले आहे. या सर्व मंडळींनी हा सर्व प्रकार केला तरी कशासाठी? याचा तपास पोलिस तपास करत आहे.

Previous Post

अमळनेरात सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास

Next Post

जळगावात एकाने मागितली ५ लाखांची खंडणी; गुन्हा दाखल

Next Post
जळगावात एकाने मागितली ५ लाखांची खंडणी; गुन्हा दाखल

जळगावात एकाने मागितली ५ लाखांची खंडणी; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group