Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सलमान खानला झालाय डेंग्यू
    Uncategorized

    सलमान खानला झालाय डेंग्यू

    editor deskBy editor deskOctober 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सलमान खान राहत असलेल्या अपार्टमेंटची मुंबई महापालिकेकडून पाहणी करण्यात आली. लेक्सी अपार्टमेंटच्या अडगळीच्या ठिकाणी डेंग्युच्या अळ्या सापडल्या आहेत. तरी पालिकेकडून या जागांसह संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटचं निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. बिग बॉस १६ च्या या आठवड्याच्या वीकेंड धमाक्यात होस्ट सलमान खान दिसणार नसल्याचे समजतेय. ऐन दिवाळीच्या तोंडावर सलमानला डेंग्यूची लागण झाली असून तो अजूनही रिकव्हर होत आहे.

    सलमान खानच्या घरात डेंग्युच्या अळ्या सापडल्या नसल्या तरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्याने सलमानला डेंग्युची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधीत माहिती फ्रीप्रेस जर्नलच्या वृत्ताकडून प्रसारित करण्यात आली आहे. बीएमसी कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी खुद्द अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सखोल पाहणी केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

    गॅलेक्सी परिसरामध्ये दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. पण खान यांच्या घरी अळ्या सापडल्या नाहीत. तसेच डेंग्युच्या अळ्या सापडल्यास बीएमसी सोसायट्यांना नोटीस पाठवत नाही त्याऐवजी आम्ही घरमालकांना त्यांच्या घरात अळ्या आढळल्यास नोटीस पाठवतो, अशी माहिती राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.