चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील जिरायतपाडा येथील एका २५ वर्षीय विवाहितेचा दारूच्या नशेत असणाऱ्या एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह घरात असतांना दि २३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शिकारी मालज्या पावरा हा दारूच्या नशेत लाकडी दांडका घेवून घरातील मागच्या दाराने येत महिलेच्या पतीच्या अंगावर धावून येत असतांना पती घराबाहेर गेला असता, संशयित आरोपीने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिकारी मालज्या पावरा याच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.देविदास ईशी हे करीत आहेत.