Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गरजवंतांच्या हास्याने सजली मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनची रांगोळी!
    जळगाव

    गरजवंतांच्या हास्याने सजली मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनची रांगोळी!

    editor deskBy editor deskOctober 24, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    मुन्नादेवी मंगलादेवी फाउंडेशन संचलित ज्योतीदेवी अन्नपूर्णा भांडार तर्फे दिवाळीच्या मंगल मुहूर्तावर, फराळ, मिठाई, कपडे आणि दिवे वाटपाचा कार्यक्रम धरणगाव येथे दिनांक २३ ऑक्टोबर, २०२२ रोजी संपन्न झाला.

    शहरातील प्रमुख व्यापारी आणि समाजसेवक जीवनसिंह बयस तसेच मुकेशसिंह बयस यांच्या अथक प्रयासाने मुन्नादेवी and मंगलादेवी फाउंडेशन हि संस्था अनेक खडतर अडचणींचा सामना करून धरणगाव परिसरात भरीव समाजकार्य करत असते. एरव्ही अवघ्या तीस रुपयात परिपूर्ण जेवणाचे ताट उपलब्ध करून देणाऱ्या आणि गावातील गरजू लोकांना दररोज खिचडी वाटप करणारी हि संस्था, आपल्या अन्य उपक्रमांमार्फत आदिवासी, अनुसूचित जाती जमाती तसेच समाजातील अभावग्रस्त लोकांसाठी संपूर्ण उर्जेने काम करत असते.

    शालेय साहित्यवाटप, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थांचा शिक्षणाचा खर्च उचलणे यासह कोरोना काळातही आपल्या अथक परिश्रमाने थोड्याच अवधीत या संस्थेने परिसरात आपल्या कीर्तीचा लौकीक पसरवला आहे.

    या दिवाळीच्या निमित्ताने पाच दिवसाच्या दीपोत्सवात गरजू लोकांच्या आयुष्यात प्रकाश पडावा, त्यांची घरे उजळवून टाकावीत तसेच ज्यांना फराळ आणि अन्य दिवाळीच्या गोष्टी परवडणे शक्य नाहीं अशांसाठी हा उपक्रम श्रीजी जिनिंगचे संचालक आदरणीय जीवनसिंह बयस यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.

    या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. जळगाव महाकॉटचे अध्यक्ष प्रदीप जैन, जळगाव येथील चंपालालशेठ सोनी, रतनशेठ जैन, धरणगाव नगरीचे माजी अध्यक्ष सुरेश चौधरी तसेच श्रीजी जिनिंगचे संचालक नयन शेठजी गुजराती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते प्रीतम बयस, तसेच उपाध्यक्ष तेजेंद्र चंदेल, सदस्य निखिल बयस, कपीलसिंह चव्हाण, यशपाल चंदेल, महेंद्र बयस, विक्रांत बयस, लकी चंदेल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र परदेशी यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.