हिंदू पंचागानुसार, दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक अमावस्या तिथीला साजरा केला जातो. दिवाळीत अमावस्या तिथीला रात्री गणेश, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. या वर्षी, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे.
दिवाळी पूजेसाठी योग्य वेळ कोणती?
24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.53 ते 08.16 पर्यंत असेल. लक्ष्मी पूजनाचा एकूण कालावधी 01 तास 23 मिनिटे आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित पूजा साहित्य घेणे आवश्यक आहे. या दिवशी श्रीयंत्र, कुबेर यंत्राचे पूजन लाभदायक आणि प्रगती देणारे मानले जाते. दिवाळीमध्ये ज्या घरांमध्ये स्वच्छता असते, लक्ष्मीची रोज पूजा केली जाते. त्या घरांमध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो.
पूजेचा कालावधी: 1 तास 21 मिनिटे
प्रदोष काल : 17: 43 : 11 ते 20 :16 :07
वृषभ कालावधी : 18: 54: 52 ते 20: 50: 43
दिवाळीत लक्ष्मी पूजनाची पद्धत जाणून घ्या
लक्ष्मीपूजनासाठी प्रथम घरात गंगाजल शिंपडावे. घराच्या मुख्य गेटवर रांगोळी आणि दिवे लावा. पूजेच्या ठिकाणी चौरंग ठेवून त्यावर लाल कपडा पसरवावा. त्यानंतर लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवा. पाण्याने भरलेला कलश ठेवा. माता लक्ष्मी आणि गणेश यांच्या मूर्तीसमोर दिवा लावा. नंतर त्यांना हळद -कुंकू लावून, तांदूळ, फळे, गूळ, बत्ताशे इत्यादी अर्पण करा. यासोबतच देवी सरस्वती, देवी काली, भगवान विष्णू आणि कुबेर देव यांची पूजा करा. यानंतर तिजोरीचीही म्हणजेच धनाची पूजा करावी. यानंतर देवाला मिठाई आणि फळे अर्पण करा. देवी लक्ष्मीजींची आरती करा.