पालघर : वृत्तसंस्था
पालघर शहरात विष्णूनगर परिसरामधील वर्धमानसृष्टी या गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास या चिमुकलीच्या नातेवाईकाने तिचे अपहरण केले पोलिसांनी अवघ्या दोन तासात चिमुकलीसह अपहरणकर्त्याला शोधून त्याला ताब्यात घेतले.
सनी कांबळे या तरुणाने या मुलीच्या घरातून तिला फिरवण्याच्या व खाऊ देण्याच्या बहाण्याने नेले. मात्र आपली मुलगी घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर अचानक अपहरण करता सनी कांबळे यांनी या चिमुकलीच्या वडिलांना फोन करून त्यांच्याकडून एक लाखापेक्षा जास्त खंडणी मागितली. असे करताना तो आपली ठिकाण चीमुकलीसह वारंवार बदलत होता.
मुलीचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर मुलीच्या आईने व नातेवाईकांनी पालघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपविभागीय अधिकारी नीता पाडवी, पालघरचे पोलीस ठाणे अधिकारी उमेश पाटील यांनी वेगवेगळी पथके करून मिळालेल्या माहितीच्या आधारे व आपली तपासचक्र फिरवून या अपहरणकर्त्याला केळवे येथुन चिमुकलीसह ताब्यात घेतले. त्याला पालघर पोलीस ठाण्यात आणले असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे. शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे पोलीस कर्मचारी रमेश पालवे, भगवान आव्हाड, सागर राऊत, कल्पेश पाटील आदीनी शोधकार्यात महत्वाची भूमिका घेतली.