चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील गरताड येथील रात्रीच्या सुमारास घरात घुसून घरफोडी करत २ लाख ८५ हजाराचा सोने चांदीसह रोकड लाबविल्याची घटना उघकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गरताड येथील केशरलाल मोतीलाल पाटील(वय ४६) हे शेतीसह खाजगी नोकरी करून आपल्या उदरनिर्वाह करीत आहेत. दि १९ रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्ती यांच्या मालकीच्या घरातील मागील बाजूचा दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातील सोने व चांदीचे दागिने यासोबत रोकड रक्कम तब्बल २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे लंपास केली आहे. या प्रकरणी केशरलाल मोतीलाल पाटील यांनी दि २० रोजी चोपडा शहर पोलीस स्थानक गाठत अनोळखी विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी घनश्याम तांबे हे करीत आहेत.