• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजामीनपात्र वॉरंट जारी ; नवनीत राणांची खासदारकी धोक्यात ?

editor desk by editor desk
October 21, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य
0
अजामीनपात्र वॉरंट जारी ; नवनीत राणांची खासदारकी धोक्यात ?

मुंबई : वृत्तसंस्था

बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार आहे. मुलूंड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. आता पोलिस काय कारवाई करणार, याची उत्सुकता आहे.

खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या महिन्यापासून यावर सुनावणी सुरूय. राणा यांनी याप्रकरणी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, तिथेही या कारवाईला स्थगिती मिळाली नाही. या प्रकरणी 7 नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होण्याची शक्यताय. तोपर्यंत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस आहे, असा दावा करत शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर जून 2021 मध्ये कोर्टाने हे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे म्हणत ते रद्द केले. राणा यांना दोन लाखांचा दंड ठोठावला. त्यानंतर राणा यांनी त्याच महिन्यात या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.

नवनीत राणा यांच्या वडिलांनी बोगस जात प्रमाणपत्र मिळवले. त्यासाठी यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बोगस दाखला दिला, असा आरोप राणांवर ठेवला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवरही मुलूंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Previous Post

माजी मंत्र्याचा भाजपला धक्का : केला ठाकरे गटात प्रवेश

Next Post

उद्या देशातील ७५ हजार तरुणांना नियुक्तिपत्र: मोदी सरकारचा मोठा निर्णय 

Next Post
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा घेणार सेवा पंधरवाडा

उद्या देशातील ७५ हजार तरुणांना नियुक्तिपत्र: मोदी सरकारचा मोठा निर्णय 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group