धरणगाव : प्रतिनिधी
मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ मानला जाणारा जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकासह कार्यकर्ते आज दि २१ रोजी शिंदे गटात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रवेश करीत ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
धरणगावचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज सकाळी पाळधी येथील शासकीय निवासस्थान गाठत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शिंदे गटात दाखल झाल्याने धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला एक मोठा धक्का मंत्री पाटील यांनी दिला आहे. दि २१ रोजी सकाळी १० वा. हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, गटनेते पप्पू भावे, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, माजी नगरसेवक वासू चौधरी, विलास महाजन, विजय महाजन, बुटया पाटील कमलेश बोरसे. बाळू जाधव. विजय महाजन. भैय्या महाजन. वाल्मिक पाटील, संजय चौधरी. डॉ विलास महाजन.पवन महाजन.रवी महाजन.सद्दाम सय्यद. प्रशांत देशमुख. उपस्थित होते