जळगाव : प्रतिनिधी
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २७ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत असे की, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय महिला मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. या विवाहितेच्या मुलीच्या वाढदिवसाच्या १५ दिवसानंतर संशयित आरोपी गणेश निवृत्ती सपकाळे(रा. भादली व ह.रा.पुणे) याने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जळगावातील विवाहितेच्या मैत्रिणीच्या घरी तसेच पुणे येथे अत्याचार केले. दि ९ फेब्रुवारी २०२२ व दि २५ मे २०२२ रोजी पुणे येथे तिच्यावर अत्याचार करून पुणे येथील सिव्हील हॉस्पिटल येथे क्रिटीग करून गभीर स्वरूपाचा गुन्हा केला. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी गणेश सपकाळे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय अनिस शेख हे करीत आहेत.