जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सुप्रिम कॉलनीतील रहिवासी कैलास रमेश जाधव (वय-४३) यांच्या मालकीची क्र.एम. एच. 19 बी एक्स 3607 हि दुचाकी दि २ ऑक्टोबर रोजी सिव्हील हॉस्पिटलच्या मेन गेटच्या समोर असलेले डे नाईट मेडिकलच्या बाजुला रोडाला लागून सार्वजनिक रस्त्यावरून चोरीला गेली होती. त्याबाबत जिल्हा पेठ पोलिसात त्यांनी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केलेला होता.
त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना जिल्हा पेठ पोलिसांनी सापळा रचत सशयित आरोपी अजय शंकरसिंह चव्हाण (वय २९) रा. विठ्ठल मंदिरा जवळ सुप्रीम कॉलनी यास ताब्यात घेतले असता. त्याने दुचाकीला बनावट नंबर प्लेट लावून MH-41- LA -4314 दुचाकी चोरी केली होती. याबाबत जिल्हा पेठ पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत जिल्हा पेठ पोलीस स्थानकाचे पोना.जुबेर तडवी, पोशि.अमित मराठे यांनी अटक केली आहे.