अडावद : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील अडावद येथील शेतशिवारात मध्यरात्री सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी १७ रोजी मध्यरात्री छापा टाकला. कारवाईत तीन लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत, १३ जणांवर गुन्हा दाखल केला.
जुगाराची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना सोबत घेत, १७ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शेतशिवारात जाऊन जुगाराच्या अड्डयावर छापा टाकला. कारवाईत चार दुचाकी, व एकलाख २२ हजार ५०० रुपये रोख असा तीन लाख ७१ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संशयित भाऊसाहेब पाटील, विनोद पाटील, दीपक जोशी, जुनेद शेख, रामचंद्र महाजन, अरुण पाटील, इक्बाल, लिलाधर साळुंके, रमाकांत डोळे, भरत शालिक, जिगर भिल, सुरेश कोळी, प्रवीण महाजन यांच्यावर अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक शरीफ तडवी तपास करत आहेत.