धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्री खु आणि चावलखेडा येथे अन्न सुरक्षा मोहिम अतंर्गत पिक प्रात्यक्षीक रब्बी ज्वारीचे (दादर) फुले रेवती बियाणे शंभर टक्के अनुदानावर वाटप कण्यात आले.
यावेळी पिंप्री खु. चे सरपंच नानाभाऊ बडगुजर, उपसरपंच मंगल अण्णा पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच याप्रसंगी कृषी सहाय्यक पद्माकर पाटील यांनी शेतकरी बांधवांना बियाण्याविषयी माहिती देऊन तृणधान्य पिकाचा पेरा वाढावा असे आवाहन देखील केले.तसेच तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी सन 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होणार असल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकांसोबत तृणधान्य पिकाचा पेरा वाढवण्यासाठी आवाहन केले आहे.