Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सिरीयल अभिनेत्री टक्करचा ‘तो’ शेवटचा व्हीडीओ झाला व्हायरल
    क्राईम

    सिरीयल अभिनेत्री टक्करचा ‘तो’ शेवटचा व्हीडीओ झाला व्हायरल

    editor deskBy editor deskOctober 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    इंदूर येथील राहत्या घरी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री वैशालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अचानक समोर आलेल्या या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

    https://www.instagram.com/reel/CjkKpocLMUu/?utm_source=ig_web_button_share_sheet

     

    मृत्यूच्या 5 दिवसांपूर्वी वैशाली टक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा एक मजेदार व्हिडिओ होता. यामध्ये वैशाली म्हणताना दिसत आहे ‘बेबी, मी तुझ्यासाठी एक गाणं गाऊ?’ यानंतर ‘दिल, जिगर, नजर काय आहे मी तुझ्यासाठी जीवही देईल’ हे गाणे म्हणते. इन्स्टाग्रामवर वैशालीचा हा मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
    छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहत होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. वैशाली टक्कर आत्महत्येप्रकरणी तेजाजी नगर पोलीस ठाणे तपास करत आहेत. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याने लवकरच या घटनेचा उलघडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.