• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाण्यात एका साधूला मारहाण ; खुनाचा गुन्हा दाखल

editor desk by editor desk
October 16, 2022
in क्राईम, राज्य
0
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात काही दिवसांपूर्वी मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून विविध जिल्ह्यात नागरिकांनी अनोळखी लोकांना मारहाण केली होती, त्यानंतर हे कृत्य थांबविण्यासाठी राज्यातील पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते. सांगलीमध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना घडली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एका साधूला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका जणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील श्रीनगर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. मंदिरातील एका साधूवर एका इसमाने प्राणघातक हल्ला केला. संबंधित साधू आणि हल्लेखोर हे दोघेही एकाच परिसरात राहणारे आहे. दारूच्या नशेत या इसमाने साधूवर चाकूने हल्ला केला. दारुच्या नशेत ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्याने मारहाण केली तो दारु प्यायलेला होता. या घटनेनंतर साधूने श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरावर खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान, महिन्याभरापूर्वीच सांगलीमध्ये पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. मुल चोरणारी टोळी असल्याची संशयावरून ही मारहाण करण्यात आली होती.
चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने बेल्टने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आता पर्यंत 8जणांना ताब्यात घेऊन 7 लोकांना अटक करण्यात आली आहे. मारहाण झालेले चार ही साधू उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मथुरा पंचदर्शन जुना आखाड्यातील आहेत. ते कायम विविध धार्मिक स्थळी भेट देतात. नेहमीप्रमाणे त्यांनी कर्नाटकातील काही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मंगळवारी वारकरी संप्रदायातील मुख्य ठिकाण पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी ही घटना घडली होती.

Previous Post

राज्यात दिवाळीत यंदा पाऊस बरसणार ; हवामान खात्याने दिला इशारा

Next Post

सिरीयल अभिनेत्री टक्करचा ‘तो’ शेवटचा व्हीडीओ झाला व्हायरल

Next Post
सिरीयल अभिनेत्री टक्करचा ‘तो’ शेवटचा व्हीडीओ झाला व्हायरल

सिरीयल अभिनेत्री टक्करचा 'तो' शेवटचा व्हीडीओ झाला व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group