जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात एका ६१ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका ४२ वर्षीय महिला दि १५ रोजी रात्री ८ वाजता रीडिंगहून एका गल्लीतून घरी जात असताना एक ६१ वर्षीय संशयित आरोपी विजय विनायक काळकर हा महिलेची वाट बघत थाबलेला दिसला, महिला पुढे गेली असता तिच्या मागे येत अंधाराचा फायदा घेत तू मला किती दुर्लक्ष करणार आहे, तू माझ्या सोबत ये तुला सुखी ठेवेल असे म्हणत महिलेचा मनाला लज्जा उत्पन होईल असे कृत्य केल्या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात सशयित आरोपी विजय विनायक काळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोहेकॉ रविद्र सोनार हे करीत आहेत.