धरणगाव : प्रतिनिधी
वाचन प्रेरणा दिवस म्हणून लिटल ब्लॉसम शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांच्या सारखे व्यक्ती पुन्हा होणार नाहीत असे प्रतिपादन श्री.पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना केले.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल यांच्या ९१ वी जयंती म्हणजेच वाचन प्रेरणा दिवस म्हणून लिटल ब्लॉसम शाळेत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित धरणगांव पोलिस स्टेशन चे पि.एस.आय. संतोष पवार साहेब व कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मा.सुनिल भाऊ चौधरी.,लिटल ब्लॉसम शाळेचे अध्यक्ष मा.दिपक आबा जाधव., शाळेचे प्रिन्सिपल दिपक तावडे.,व महाराष्ट्र न्युज चॅनल चे संचालक व पत्रकार विजय पाटील तसेच सर्व विद्यार्थ्यांना व शाळेचे शिक्षिकांना अब्दुल कलाम साहेब यांच्या विचारांचे पुस्तक भेट देण्यात आले. याप्रसंगी नकिया अमीन बोहरी मॅडम यांचा विशेष अब्दुल कलाम साहेब यांचा ग्रंथ व फोटो फ्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रतिभा चौधरी मॅडम व आभार नकिया अमिन बोहरी मॅडम यांनी केले.व कार्यक्रम यशस्वीते साठी प्रमोद पाटील सर,तेज चौधरी,भावसार मॅडम,भाटिया मॅडम व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.