चोपडा : प्रतिनिधी
धरणगावच्या एका तरुणाची शहरातील महात्मा फुले नगरातील रहिवासी सैयद तनवीर सैयद रहीम यांच्या घरासमोरून क्रुझर चारचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, धरणगावातील गुजराथी गल्लीतील रहिवासी पवन सुरेश कासार यांच्या मालकीची चारचाकी चोपडा शहरातील महात्मा फुले नगरातील सैयद तनवीर सैयद रहीम यांच्या घरासमोरून साधारण पावणे चार लाख रुपये किंमत असलेली क्रुझर ही चारचाकी कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि ९ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी गाडीचे मालक पवन सुरेश कासार यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.किरण गाडीलोहार हे करीत आहेत.