धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चमगाव शिवारात मध्यरात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून फडशा पडला आहे. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चमगाव येथील शेतकरी हनुमंतराव सावंत याचे चमगाव शिवारात शेत असून त्यांनी शेतात काल शनिवारी ४ सप्टेंबर रोजी गाय बांधली होती. दरम्यान मध्यरात्री बिबट्याने गायीवर हल्ला करून फडशा पाडला आहे. दोन दिवसांपुर्वी देखील परिसरातील काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. आज सकाळी गायीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर हनुमंतराव सावंत यांनी तलाठी आशिफ शेख आणि एरंडोल वनविभागाचे अधिकारी राजकुमार ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसराती शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.