धुळे : वृत्तसंस्था
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर महाजन हे पहिल्यांदाच धुळ्यात आले होते. ‘उद्धव ठाकरे हे कधी कोणाला मुख्यमंत्री बनवणार होते तर कधी कोणाला मुख्यमंत्री बनवणार असल्याचं सांगताय. मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे सत्ता गेल्यानंतर ते आता मुख्यमंत्रिपदाच्या नावाने गुदगुल्या करत आहे. सत्ता गेल्यामुळे आता या सर्व गंमतीजमती केल्या जात असल्याची टीका महाजन यांनी केली. ‘खडसेंनी यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांनी केलेले अनेक पराक्रम आता समोर येत आहेत. पक्षात जाती पातीच्या आधारे नव्हे तर गुणांच्या आधारे संधी दिली जाते, असे सांगत खडसेच्या टिकेला महाजनांनी उत्तर दिले आहे.
यावेळी त्यांनी ‘त्या’व्हायरल झालेल्या क्लिपबद्दल स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की, ‘मला वाटतं खरं, प्रामुख्याने हा विषय माझा नाही. शिक्षक जरी भरायचे असले तरी जिल्हा परिषदमध्ये काम करतात. याबद्दलचा निर्णय हा शिक्षण खाते करत असतं. दीपक केसरकर हे त्या खात्याचे मंत्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, हा विषय छोटा आहे. कालपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. 400 ते 500 लोकांनी मला सारखे फोन केले. मी त्यांना सांगितलं की, सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिक्षक कमी आहे, याबद्दल चर्चा झाली होती शिक्षण खात्याने याबद्दल मनावर घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ते दोन महिन्यात निर्णय घेणार असं आश्वासन दिलं आहे. सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे’ असं महाजन यांनी सांगितलं.
‘मागच्या सरकारच्या काळात या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता. याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे हा विषय लवकरात लवकर, दोन ते तीन महिन्यात आम्हाला विषय मार्गी काढायचे आहे. शिक्षकांच्या भरती करायच्या आहे. त्या शिक्षकांची भरती कशी करायची याबद्दल शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा सुरू आहे, लवकरच यावर निर्णय होईल, असं आश्वासनही गिरीश महाजन यांनी दिलं. तसंच, संजय राऊत यांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्राबद्दल महाजन यांनी बोचरी टीका केली आहे. ‘संजय राऊत यांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचीच अधिक चिंता दिसून येत आहे. कारागृहामध्ये मोबाईलची सुविधा नसल्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं असेल अशी उपासात्मक टीका महाजन यांनी केली.