धरणगाव : प्रतिनिधी
मागील २० ते २५ दिवसापासून शहरात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला. शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा धडकला. परंतू याठिकाणी जबाबदार अधिकार उपस्थित नसल्यामुळे नागरिक अधिकचे संतप्त झाले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार घालत कॅबीनला टाळे ठोकून आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर मोर्चेकरांनी शहरातील उड्डाणपुलाजवळ येत रस्ता रोको केला.
मुख्याधिकारी यांना बोलावून देखील ते येत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी थेट उड्डाण पूल गाठत रास्तारोको आंदोलन सुरु केले होते. मुख्याधिकारी येत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करू अशी भूमिका घेत रास्तारोको आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे दुतर्फा वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर मुख्याधिकारी आले व त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत समजूत काढली. तसेच पुढील काही दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तर गावाचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुलाबराव वाघ यांनी दिला. पुढील काही दिवसातच गावातील पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेने आपले रास्तारोको आंदोलन मागे घेतले. दरम्यान, २० ते २५ दिवसापासून शहरात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला होता.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष उषाताई गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पुरभे, भरत महाजन, लक्ष्मण महाजन, शरद माळी, संतोष सोनवणे, गोविंद कंखरे, भागवत चौधरी, कृपाराम महाजन, महेश चौधरी, जयेश महाजन, दिलीप महाजन, बाळू महाजन, रामकृष्ण महाजन, बापू महाजन, विलास पवार, सुनील जावरे यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.