सावदा : प्रतिनिधी
तालुक्यातील चिनावल या गावातून एकाची दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चिनावल गावातील रोझोदा रोडवरील रहिवासी संतोष भास्कर चौधरी(वय ३६) यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी दि ८ रोजी रात्रीच्या सुमारास कुणीतरी अनोळखीने लांबविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर चौधरी यांनी दुचाकीचा गावात शोध घेतला परंतु कुठेही आढळून न आल्याने त्यांनी सावदा पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास युसुप अमीर तडवी हे करीत आहेत.